
नांदगाव ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिरात आज (दि. १० ऑगस्ट २०२६, सोमवार) आयोजित करण्यात आलेला ‘माता पालक संघाचा मेळावा’ हा शालेय आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळेइतकाच पालकांचा, विशेषतः आईचा वाटा अत्यंत मोलाचा असतो. अशा प्रकारच्या मेळाव्यांतून अनेक सकारात्मक गोष्टी साध्य होतात:
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. सौं नंदाताई भैयासाहेब चव्हाण, कृषिकुंभ पुरस्काराने सन्मानित असे व्यक्तिमत्व लाभले तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक मा. श्री शांताराम उफाडे सर, अधीक्षक मा. भैय्यासाहेब चव्हाण सर, आहेर सर, माता पालक संघाचे माजी उपाध्यक्षा सौं. अश्विनी कुमावत तसेच कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या शाळेच्या प्राचार्या मा. सुनिता बाळासाहेब जाधव मॅडम सर्व अतिथींनी मिळून दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौं. जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आई व मुलाचे नाते कसे असावे हे स्पष्ट केले. मा. उफाडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. गतवर्षीचा अहवाल वाचन श्रीम. खानदेशी मॅडम यांनी केले. फलक लेखन बाविस्कर मॅडमनी केले.
यानंतर नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली व जुन्या कार्यकारणीला निरोप देण्यात आला.
सन 2026-27 या वर्षासाठी . प्रत्येक वर्गातून एक सदस्य निवडून सौ. सुवर्णा चांगदेव आहेर यांची उपाध्यक्षा पदी निवड सर्वानुमते करण्यात आली. पत्रकार बंधू श्री किरण काळे यांचे अधीक्षकांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आशा सोनवणे ( शेवरे )मॅडम यांनी केले.आभार श्री. जाधव सर यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

