
विंचूर ( प्रतिनिधी ) विंचूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सप्ताहाची सांगता भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यानिमित्त बालगोपालांच्या मृदंगाच्या मंगलमय निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विंचूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बालगोपालांनी मृदंगाच्या तालावर सादर केलेल्या भक्तिमय वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

“ज्ञानोबा-तुकाराम, राम कृष्ण हरी” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवली.

