
पिंपरखेड (पिंपरखेड) सोमवार दि.10/8/2026 रोजी जि.प.प्राथ.शाळा पिंपरखेड येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण साठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्रथम सर्व पालकांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण पवार सर व शाळेचे आधारस्तंभ सिनियर व तंत्रस्नेही शिक्षक श्री. मनोज डोंगरे सर यांनी पालकांना समिती गठणाचे नियम प्रमाण समजावून सांगितले.कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन पालकांना सदस्य निवड करण्यास सांगितले.सदस्यांची नियमानुसार निवड झाल्यानंतर त्यांच्यामधुनच अध्यक्ष व उपाध्यक्षांची व शिक्षणतज्ज्ञ यांची निवड करण्यात आली

.श्री. किरण बळीराम राठोड यांची अध्यक्ष पदी तर सौ. योगिता सोमनाथ मोरे यांची उपाध्यक्षपदी व शिक्षण तज्ञ म्हणून निलेश चव्हाण यांची सदस्यांमधून निवड करण्यात आली.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.श्री.मनोज डोंगरे सरांनी सर्व कार्यक्रमची सुत्रे सांभाळली . मुख्याध्यापक श्री.पवार सरांनी सर्व नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांची यादी सर्वांना उभे करून घोषित केली व शाळेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन केले.त्याच बरोबर मुख्याध्यापकांनी ज्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली होती शाळेचे पुर्वीचे अध्यक्ष श्री.गोरख भाऊ चव्हाण यांनी आज पर्यंत शाळेला केलेले सहकार्य व मदतीचा आवर्जून उल्लेख केला व त्यांचे आभार मुख्याध्यापकांनी मानले.शेवटी सर्वानुमते सभा संपन्न झाली.शेवटी श्रीमती सावळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व सभा समारोप करण्यात आली.

