
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५९ वा दिवस

मोती बनविण्यासाठी केवळ स्वाती नक्षत्रातल्या पावसाच्या पाण्याचा एक थेंब ओठात घट्ट मिटून समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यासारखे आपण बनवूयात. प्रथम नीट कान देऊन ऐका. डोळे उघडे ठेवून पहा. ऐकलेले किंवा पाहिलेले नीट समजून घ्या, यश मिळवण्यासाठी आणि आत्मिक विकास साधण्यासाठी मन एकाग्र करा, आणि मग चित्त विचलित करणाऱ्या साऱ्या मोह-मायापासून सतत दूर राहा. त्यासाठी आपल्या मनाची कवाडे घट्ट बंद करून घ्या. सतत मनन चिंतन करून त्या परम सत्याचे मौक्तिक विकसित होऊ द्या.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २० शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६
★ संत सावता माळी पुण्यतिथी ७३१ वा संजीवन समाधी सोहळा.
★ १९०८ क्रांतीकार खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन
★ १९४३ “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे” पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख यांची नियुक्ती झाली.
★ १९७० साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचा स्मृतिदिन.

