
सायखेडा ( बातमीदार-) मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यु.के.पवार सर व प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे माजी मुख्याध्यापक श्री किशोर जाधव सर हे उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व प्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विज्ञान छंद मंडळाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शिंदे पी. पी. यांनी केले.प्रमुख पाहुणे श्री किशोर जाधव सर यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी केला यावेळी व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार सर यांच्या हस्ते नवीन विज्ञान छंद मंडळाच्या कार्यकारिणीतील विद्यार्थी व शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विज्ञान शिक्षिका श्रीमती अर्चना आरोटे यांच्या संकल्पनेतून साकारलेली विज्ञान दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते – प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे श्री किशोर जाधव सर यांनी आजच्या डिजिटल युगात विज्ञानाची गरज व आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने या विज्ञान छंद मंडळाच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. मा. मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान छंद मंडळाच्या उपक्रमांत सहभागी होऊन विज्ञानातील संकल्पना समजून घ्याव्यात असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना आरोटे यांनी केले. यावेळी विज्ञान शिक्षक श्री चौधरी सर श्रीमती घुले मॅडम,श्रीमती भारस्कर मॅडम, श्रीमती बागले मॅडम श्रीमती आरोटे मॅडम श्रीमती मोरे मॅडम, श्रीमती गडाख मॅडम
श्रीमती पगारे मॅडम, श्रीमती पोटे मॅडम श्रीमती जाधव मॅडम, श्री शुभम भंडारे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्रीमती आरती जाधव यांनी केले. फलकलेखन श्री महाले सर व श्रीमती कापडी मॅडम यांनी केले.

