
कवी गोविंद काव्य स्पर्धा -:
१) नाशिक जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या कवींनाच यात भाग घेता येईल.
२) प्रत्येकाने आपली फक्त एकच उत्तम कविता दोन प्रतीत टपालाने अगर समक्ष पाठवावी.
३) कविता स्वतंत्र व अप्रकाशित असावी. विषयाचे बंधन नाही.
४) कवितेची स्थळ प्रत आपल्या जवळ ठेवावी. कवितेची प्रत परत मिळणार नाही.
५) आपली कविता दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत वाचनालयात पोहचणे आवश्यक आहे.
६) कवितेच्या कागदावर नाव न लिहिता कवितेचे नाव, कवीचे नाव व पत्ता स्वतंत्र कागदावर लिहावा.
पहिले पारितोषिक – रु.१००१/- प्रमाणपत्र, दुसरे पारितोषिक – रु.७५१/- प्रमाणपत्र, तिसरे पारितोषिक – रु.५०१/- प्रमाणपत्र.
डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा -:
१) नाशिक जिल्हात वास्तव्य करणाऱ्यांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल.
२) कथेची शब्दमर्यादा तीन हजार शब्द असून कथा दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवावी.
३) कथा स्वतंत्र व अप्रकाशित असावी. विषयाचे बंधन तसेच विनोद वगैरे स्वरूपाचे बंधन नाही.
४) कथेच्या कागदावर लेखकाने नाव न लिहिता स्वतंत्र कागदावर नाव, पत्ता व कथेचे नाव लिहावे.
५) कथेची स्थळ प्रत आपल्याजवळ ठेवावी. कथेची प्रत परत मिळणार नाही.
पहिले पारितोषिक – रु.१००१/- प्रमाणपत्र, दुसरे पारितोषिक – रु.७५१/- प्रमाणपत्र
चंद्रकांत महामिने पुरस्कृत विनोदी कथा स्पर्धेचे -:
१) कथा २५०० शब्दांपर्यंत असावी.
२) कथा अप्रकाशित असावी तसे प्रमाणपत्र कथेसोबत जोडावे.
३) कथेसोबत स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व कथेचे नाव लिहिलेला स्वतंत्र कागद जोडावा. कथा विनोदी प्रकारची असावी.
४) ही स्पर्धा फक्त नाशिक जिल्हातील लेखाकांसाठीच आहे.
५) उत्कृष्ठ कथेला रु.५००/- चा पुरस्कार देण्यात येईल.
६) आपली कथा दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवावी.
कै. जयश्री पाठक कविता संग्रह पुरस्कार स्पर्धेचे -:
१ ) नाशिक जिल्हात वास्तव्य करणाऱ्या कवींनाच या स्पर्धेत भाग घेता येईल.
२ ) प्रत्येकाने आपला फक्त एकच उत्तम कविता संग्रह दोन प्रतीत टपालाने अगर समक्ष पाठवावी.
३ ) कविता संग्रहाला विषयाचे बंधन नाही.
४ ) कविता संग्रहाची स्थळ प्रत परत मिळणार नाही.
५ ) आपला कविता संग्रह दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवावा.
६) उत्कृष्ट कविता संग्रहाला रु.३०००/- चा पुरस्कार देण्यात येईल.
श्रीमती मधुवंती अशोक केंघे कविता संग्रह पुरस्कार स्पर्धेचे -:
१ ) नाशिक जिल्हात वास्तव्य करणाऱ्या कवींनाच या स्पर्धेत भाग घेता येईल.
२ ) प्रत्येकाने आपला फक्त एकच उत्तम कविता संग्रह दोन प्रतीत टपालाने अगर समक्ष पाठवावा.
३ ) कविता संग्रहाला विषयाचे बंधन नाही.
४ ) कविता संग्रहाची स्थळ प्रत परत मिळणार नाही.
५ ) आपला कविता संग्रह दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवावा.
६) उत्कृष्ट कविता संग्रहाला रु.१५००/- चा पुरस्कार देण्यात येईल.
श्रीमती मधुवंती अशोक केंघे कथासंग्रह पुरस्कार स्पर्धेचे -:
१ ) नाशिक जिल्हात वास्तव्य करणाऱ्या लेखकांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल.
२ ) प्रत्येकाने आपला फक्त एकच उत्तम कथा संग्रह दोन प्रतीत टपालाने अगर समक्ष पाठवावा.
३ ) कथा संग्रहाला विषयाचे बंधन नाही.
४ ) कथा संग्रहाची स्थळ प्रत परत मिळणार नाही.
५ ) आपला कथा संग्रह दि. ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवावा.
६) उत्कृष्ट कथासंग्रहाला रु.१५००/- चा पुरस्कार देण्यात येईल.
आपली कविता, कथा, कवितासंग्रह व कथासंग्रह
मा. प्रमुख सचिव, सार्वजनिक वाचनालय, टिळक पथ, नाशिक – ४२२००१. या पत्त्यावर दिनांक ३१ ऑगस्ट,२०२६ पर्यंत पाठवाव्यात.

