
वासोळ इंदिरा माध्यमिक विद्यालयात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करतांना…
वासोळ:- ( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केदार एस.एस. मुख्याध्यापक हे होते.
सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली. व नंतर अध्यक्षीय भाषणात श्री.केदार एस.एस.यांनी आहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याविषयी माहीती सांगितली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आहेर सर व आभार प्रदर्शन श्री.निकम एस.के यांनी केले.

