
नाशिक (प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा अमितजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्ह्यात विद्यार्थी सेना सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुसंघाने जिल्हा अध्यक्ष महेशजी लासुरे. व जिल्हा उपाध्यक्ष मिथुन पवार यांच्या मार्गदर्शनाने नांदगाव तालुका व मनमाड विद्यार्थी सेने च्या वतीने आज महात्मा गांधी महाविद्यालय मनमाड येथे सभासद नोंदणी प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्याथ्यांनी नोंदणी करून सभासदत्व प्राप्त केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव ता. अध्यक्ष नाना भाऊ आहेर. मा. ता अध्यक्ष सुनील कोल्हे. मनमाड शहर अध्यक्ष. सचिन शिरुड. विधानसभा अध्यक्ष राजूभाऊ तरंगे. सतिष अहिरे.उपाध्यक्ष शंकर आंधळे. बाजीराव शेजवळ. जाकीर पठाण. योगेश आहेर. संदिप पांडव. साहेबराव गढकर.बाळू शिंदे. आदी उपस्थित होते. सभासद नोंदणीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता. अध्यक्ष गोरख गुंडगळ. उप ता अध्यक्ष सागर पोमणार. उप ता. अध्यक्ष कुणाल घुगे. साईनाथ शिंदे. ऋषिकेश उगले. शिवम उगले आदींनी केले

