
नाशिक:-( प्रतिनिधी ) पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित आणि सप्तर्षी माळी लिखित ‘अटलनामा’, स्वाती उपाध्ये लिखित ‘ अटलबिहारी वाजपेयी’ (इंग्रजी), मोहित पुरोहित लिखित ‘भारतरत्न लालकृष्ण अडवाणी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. सावानाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात होणार आहे.
सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यास भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, गोदावरी अर्बन बँकेच्या चेअरमन अमृता पवार, सावानाचे ग्रंथसचिव देवदत्त जोशी, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लेखक सप्तर्षी माळी, स्वाती उपाध्ये, मोहित पुरोहित यांची उपस्थिती राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर सूत्रसंचालन करणार आहेत. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

