
नांदगाव 🙁 प्रतिनिधी )मविप्र समाजाचे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ तिरंगा’ हा देशभक्तीपर उपक्रम महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रभात फेरी घालून उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. देशाप्रती प्रेम, राष्ट्रीय एकात्मतेची भावना तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी या प्रभात फेरीस प्रथम मान्यता दिली व त्यानुसार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एम.आहिरे, प्रा. वाय.आर.वाघ प्रा. पवार बी.के.यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी अभिमानाने राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रे व सेल्फी काढून तिरंग्याप्रती आपला आदर आणि देशाप्रती प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहकार्य केले.

