
मोरेवाडी (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी (कासारी) येथे भारताचा “८०”स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम तिरंगा रॅली काढून देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.शाळेचे ध्वजारोहण मोरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प.समाधान सुकदेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रीय गीत वंदे मातरम्,राष्ट्रगीत,राज्यगीत,ध्वजगीत सादर करण्यात आले.देशभक्तीपर कवायतीचे संचालन करण्यात आले.

तंबाखूमुक्त सामुदायिक शपथ घेण्यात आली.माननीय अन्नसुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पत्राचे वाचन करून शाळेच्या आवाराच्या ५० मीटर हद्दीत जंक फूड विक्रीचा कोणताही स्टॉल व दुकान नसल्याचे जाहीर करण्यात आले व विद्यार्थ्यांना संतृप्त चरबी,ट्रान्स्फॅट,अतिरिक्त साखर असलेल्या पदार्थाचे सेवन न करण्याबाबत सांगण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे समाधान मोरे यांनी विद्यार्थ्यांना अंकलिपी व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले,तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काभू रतन मोरे व उपाध्यक्ष साहेबराव गुलाब कर्नर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना फरसाण,मोतीचूरचे लाडू,चॉकलेट या खाऊचे वाटप करण्यात आले

.कार्यक्रमास मोरेवाडी येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक,ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समितीची सर्व कार्यकारणी,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस, स्वयंपाकी,व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले तर उपशिक्षिका योगिता कापुरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

