
मनमाड -( प्रतिनिधी )80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने औचित्य ने मनमाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन 2005 पासून यंदा सलग 22 व्या वर्षी ही स्वातंत्र्ययुध्दात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशासाठी प्राण अर्पण करणार्या शहीद सैनिकांना रक्तदानाने आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ शिबीर संयोजक व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, मनमाड बाजार समिती चे सभापती गणेश धात्रक ,भाजपा जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी, विजय मिश्रा,दिपक गोगड,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,शहर सरचिटणीस आनंद काकडे, नारायण पवार,एकनाथ बोडखे,युवा मोर्चा चे सुमेर मिसर,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन लुणावत, सचिन संघवी, कांतीलाल लुणावत आदी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. शिबीर संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी गत 22 वर्षापासून अखंड भारत दिनाचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा यज्ञ सुरु ठेवला आहे गेल्या 22 वर्षात भाजपा मनमाड तर्फे कोविड रुग्णांन सह इतर सर्व रुग्णाना रक्ता संबंधित भरीव मदत झाली असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले या भाजपा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले. भाजपतर्फे 2005 पासून सलग या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. एकच तारीख, एकच ठिकाण, एकच संयोजक व एकच रक्तपेढी असे सलग दोन दशके पेक्षा जास्त म्हणजे 22 वर्ष पूर्ण होण्याचा हा विक्रम या रक्तदान शिबीराच्या संयोजनाने मनमाड शहर भाजपा केला आहे. गेल्या 22 वर्षात सुमारे 1000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यंदाही 45 ऐच्छिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्यवीरांना या रक्तदान शिबीरात रक्तदानाने श्रध्दांजली वाहिली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास सचिन कांबळे, संतोष जगताप,भाजपा दिव्यांगआघाडी चे सप्तेश चौधरी, दिपक पगारे नारायण जगताप,अल्पसंख्यांक मोर्चा चे अकबर शहा, नितीन अहिरराव ,गणेश कासार,धीरज भाबड,प्रतिक परदेशी, शिवाजी शिंदे, सप्तेशगुप्ता, प्रवीण धाकराव, हेमंत गांगुर्डे, स्वराज करकाळे, विजय माळवतकर, भाऊसाहेब सांगळे राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे प्रकाश गाडगीळ सर,रमाकांत मंत्री,अनंता भामरे ,शिवसेनेचे नाना शिंदे, राजाभाऊ भाबड, महेश बोराडे, राकेश बन्सल आनंद गंगेलें, शीतल पांडे कुणाल गायकवाड, साहिल वाधवाणी,गौरव मुळे आदीं मान्यवरा सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रक्तदाते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भाजपा च्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ध्वज तिरंगा देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जनकल्याण रक्तकेंद्रा च्या वतीने प्रदीप देशमुख आणि त्यांच्या सहकार्या नी यांनी रक्तसंकलन केले. शिबीराचे संयोजन भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी, मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे, महेंद्र गायकवाड दिपक पगारे यांनी केले तर नितीन पांडे यांनी रक्तदात्यांचे आभार व ऋण व्यक्त केले.

