
सिन्नर (प्रतिनिधी ) शहीद डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समिती सिन्नर यांच्या वतीन हुतात्म चौक येथे अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून करण्यात आलीयाप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा व अघोरी प्रथांविरुद्ध लढा देण्यासाठी १९८९ मध्ये ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व अंनिस या संस्थेची स्थापना केली आणि ते त्याचे अध्यक्ष होते.सामाजिक कार्य आणि योगदान अंधश्रद्धा निर्मूलन समाजात पसरलेल्या बुवाबाजी, जादुटोणा आणि अंधश्रद्धांविरोधात त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली.

जादुटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र सरकार यांच्याकडे मागणी केली ती मागणी त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्यात आला असे म्हणाले.
कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी आपले शहीद डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्य बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की त्या हल्लेखोरांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केली तरीही त्यांचे विचाराचे आज लाखोच्या संख्येने डॉ.नरेंद्र दाभोळकर निर्माण झाले आहे ते माणसं मारू शकतात पण डॉक्टर दाभोळकरांचे विचार कधी मरू शकत नाही अंधश्रद्धा निर्मूलन: बुवाबाजी, अघोरी प्रथा आणि चमत्कारांच्या नावाखाली भक्तांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवणे व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक माणसाने जोपासणे गरजेचे आहेत तसेच संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावाअसा त्यांचा आग्रह होता व त्यांचे विचार आपण सर्वांनी समविचारी संघटनेंसोबत चर्चा करून त्यांच्या कार्याची जनजागृती केली पाहिजे तरच त्यांना खरी आदरांजली अर्पण केल्यासारखे होईल असे म्हणाले
डॉ. श्यामसुंदर झळके यांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देताना म्हणाले की अहिंसेचा मार्ग: विचारांची लढाई ही विचारांनीच आणि पूर्णपणे शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने लढली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. शोषणरहित समाज: अंधश्रद्धांमुळे माणसाचा स्वतःच्या कष्टावरचा आणि पुरुषार्थावरील विश्वास उडतो, म्हणून समाज भयमुक्त व शोषणापासून दूर राहिला पाहिजे. तसेच विज्ञान दृष्टी दिन त्यांच्या हत्यानंतर सरकारने जाहीर केला आहे तो दिवस प्रत्येक शाळेत महाविद्यालयात गावांमध्ये जनजागृती केली गेली पाहिजे असे म्हणाले.
स्तंभलेखक महापुरुष जीवन कार्य प्रचार व प्रसारक प्रा.प्रभाकर चतुर सर यांनी आपल्या मनोगतात डॉ.दाभोळकरांनी ग्रामीण भागातील अंधश्रद्धा,बुवाबाजी, भानामती, नरबळी जादूटोणा, चमत्काराचे दावे या दृष्टचक्रात अडकलेल्या समाजाला बाहेर काढून त्यांच्यामध्ये चिकित्सकृती, बुद्धप्रामान्यवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केला पाहिजे असे म्हटले.
वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी सांगितले की डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी जन माणसांना आपल्या व्याख्यानांमधून व लेखणीतून बुद्धी प्रामाण्यवादी बनविले. तसेच
आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी म्हटले की डॉ दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबरोबर व्यसनमुक्ती, जात पंचायत विरोध,सामाजिक समता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरही जोमाने काम केले असे आपल्या मनोगत सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले व प्रास्ताविक प्रा.प्रभाकर चतुर सर यांनी केले तर आभार विष्णू वाघ यांनी मांडले
यावेळी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे, कॉम्रेड हरिभाऊ तांबे,डॉ. श्याम सुंदर झळके, वृक्षमित्र विष्णू वाघ, स्तंभलेखक प्रा.प्रभाकर चतुर सर,आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,भगवान घोलप, निवृत्ती ढोके, अरुण पाबळे,बापूराव धनगर आदी उपस्थित होते.

