
नांदगाव ( प्रतिनिधी)-आश्रम शाळा सारताळे येथे आज दिनांक 18-8-2026 रोजी संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार व कोषाध्यक्षा सौ. नम्रता पगार मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत 1965 च्या भारत पाकिस्थान युद्धात प्रत्यक्ष लढाई लढलेल्या सेवानिवृत्त सैनिक नाईक सुभेदार बाजीराव मोहिते, हवालदार शंकर थेटे, हवालदार केवळ बोरसे, सेवा निवृत्त सैनिक फेडरेशन तालुकाध्यक्ष नानासाहेब काकळीज, हवालदार प्रभाकर पगारे, हवालदार कैलास व्हडगर, हवालदार गणेश ढोकरे, हवालदार आबासाहेब सोमवंशी इत्यादीच्या मनगटावर
आश्रम शाळेच्या मुलींनी राखी बांधून उदंड दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात व भारताच्या सिमेवर सियाचिन ग्लेशियर येथे कर्तव्य बजावत असणारे 16,मराठा लाईट इन्फंन्ट्री बटालियन युनिट साठी 500 राख्या पाठवीण्यात आल्या. सदर प्रसंगी सेवानिवृत्त सैनिक फेडरेशन नांदगाव तालुका अध्यक्ष नानासाहेब काकळीज यांनी सैनिकाच्या खडतर जीवनशैली आणि राष्ट्र सर्वोतोपरी भावनेचे कथन करीत तरुणांना सशस्त्रदला मध्ये भरती होण्याचे आव्हान केले. प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष रमेशअप्पा पगार यांनी सैनिकांचे निस्सीम देशप्रेम आणि सर्वस्व पणाला लावण्याच्या भावनेला मानवदंना करीत सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली व सदर उपक्रमा बद्दल आश्रम शाळेच्या मुला मुलींचे अभिनंदन केले.कार्यक्रम प्रास्ताविक आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले तर सुत्रसंचालन श्री दिपक सुर्यवंशीसर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेत.वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाली.

