
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६८ वा दिवस

कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही. तुम्ही सच्चा दिलाचे आहात काय? मरण आले तरी तुम्ही निःस्वार्थ राहू शकता काय? तुमचे हृदय प्रेमाने भरले आहे काय? जर असे असेल तर तुम्ही कुणालाही, एवढेच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचे कारण नाही. वत्सांनो, पुढे चला! साऱ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळविण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू वा भोंदूगिरी यामधे नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान् उपदेशात तो सामावलेला आहे
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २९ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२६
★ १९४४ भारतातील संगणक क्रांतीचे उद्गाते, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन.
★ २०१३ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, स्मृतीदिन.
★राष्ट्रीय सद्भावना दिन.
★अक्षय ऊर्जा दिन.

