
-न्यू मराठा हायस्कूलमध्ये समाजदिन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आदी….
नाशिक (प्रतिनिधी)|मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये मविप्र समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य उत्तम भदाणे हे होते.प्रमुख अतिथी मविप्र नाशिक शहर संचालक अँड.लक्ष्मण फकिरा लांडगे,माजी मविप्र सेवक संचालक गुलाबराव भामरे तसेच शालेय समिती सदस्य उखाजी पवार ,रमेश चव्हाण, राजाराम टर्ले,दिलीप देशमुख, मधुकर बिरारी,कल्पना माळोदे, जयकुमार पवार, बाळासाहेब संधान, शालेय समिती सदस्य दिपक पवार, कविता गोसावी,महेश थोरात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे , ज्ञानेश्वर कोतवाल, क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.समाजदिन ध्वजपुजन गुलाबराव भामरे,ध्वजारोहण अँड.लक्ष्मण लांडगे यांच्या हस्ते तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, विद्येची देवता सरस्वती ,छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहु महाराज व सर्व कर्मवीरांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.समाजदिना निमित्त रांगोळी स्पर्धा , पुष्परचना दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शालेय गीतमंच्या ने उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी गुलाबपुष्प देऊन केला.एस.एस.सी.माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थ्यांना रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. समाजदिनानिमित्त निबंध, रांगोळी,वक्तृत्व,सुंदर हस्ताक्षर,लाठी काठी स्पर्धेत प्रथम तीन विद्यार्थ्यांना देखील प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थी मनोगत सोहम पवार याने व्यक्त केले.शिक्षक मनोगत ज्ञानेश्वर कोतवाल यांनी केले.प्रमुख अतिथी मनोगतातून गुलाबराव भामरे यांनी संस्थेचा इतिहास व नावलौकिक बद्दल माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतातून उत्तम भदाणे यांनी मविप्र संस्थेचा इतिहास व आजची संस्थेची वाटचाल या बाबत माहिती देत विद्यालयातील मुख्याध्यापक ,शिक्षक,विद्यार्थी या सर्वांचे कौतुक करून समाजदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.सुंदर फलक लेखन, रुपाली शेडगे,विद्यार्थी मौर्य गायकवाड यांनी तर रांगोळी व इतर स्पर्धा नियोजन मोनिका कातड यांनी केले.सुत्रसंचालन अंजली निकम व आभार मनिषा उगले यांनी मानले.

