
पिंपरखेड (प्रतिनिधी). २७ जून २०२६ आज रोजी नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे साहेब यांनी पिंपरखेड येथील कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय अडीअडचणी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ईत्यादी बाबी जाणून घेतल्या. आज आनंददायी शनिवार निमित्त श्रीमती अमिता पारखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस या गणितीय क्रियांबाबत मार्गदर्शन केले. यात बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे साहेबांनी रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस दिले व मार्गदर्शकांचे कौतुक केले. शालेय शैक्षणिक वातावरण, निसर्गरम्य परिसर, विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती व संस्थेने पुरवलेल्या सोयीसुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व शाळेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी विद्यालयाच्या वतीने विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा. वसंतराव नाना मवाळ यांच्या हस्ते आमदार साहेबांचा शॉल बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नांदगाव कृषीउत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व विद्यमान संचालक दर्शनदादा आहेर यांचा सत्कार संदीपभाऊ मवाळ यांच्या हस्ते तर मा.सभापती सतिशदादा बोरसे कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, आबा सोनवणे, श्रीमती अमिता पारखे मॅडम, सौ. सोनाली उगले मॅडम आदी उपस्थित होते. संजय कांदळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

