
*नाशिक ( प्रतिनिधी ) |मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलचा विद्यार्थी रुद्र सुनिल पाटील याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शालेय कॅरम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विभागासाठी निवड झाली आहे .त्याच्या या यशाचे व त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांचे मविप्र सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी,शालेय समिती अध्यक्ष ॲड लक्ष्मणजी लांडगे तसेच सर्व सदस्य मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले

