
स्व आबासाहेब तथा झावरीबुवा किसन पा रायते.
जन्म २२/८/१९३२
शिंगवे गावचे भूमिपुत्र.सहकार . राजकीय.सामाजिक.शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अनमोल ठसा उमटविला..
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेतकरी नेते निफाड तालुक्याचे भुषण सहकार महर्षी.कर्मविर गटाचे संस्थापक स्व माधवराव काशिराम बोरस्ते .यांच्या परिसस्पर्शाने खर्याअर्थाने आबांना घडविले..
कर्मवीर गटांशी एकनिष्ठ राहीले
गोदाकाठावरीलशिंगवे गावचा शेतकरी पुत्र .शिक्षणाची गंगोत्री असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक जिल्हा संचालक .
म्हणून निवडून आले.
तो काळ च आबांच्या राजकीय कर्तृत्वाचा होता.निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक.
म्हणून निवडून आले ..
शेतकरी बांधवांची जीवनवहिनी गोदावरी लिफ्टचे चेअरमन त्यानंतर शिंगवे गावच्या सोसायटीचे चेअरमन.आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेकांना संस्थांमध्ये नोकरीला लावले गावच्या सर्वांगीण विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली .
कर्मवीर गटाचा हा ग्रामीण भागातील नेता .
शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय शरद जोशींच्या आदेशाने झालेल्या शेतकरी आंदोलनात .स्व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड. यांच्यासह.आंदोलनात सहभागी होऊन कारावास भोगावा लागला. अशा अनेक पैलूंनी स्वर्गीय आबांचे जीवन घडले त्यांच्या. जन्मदिनानिमित्त आबांच्या पवित्र स्मृतींना .
समस्त शिंगवे ग्रामस्थ.गोदाकाठ परिसराच्या वतीने विनम्र अभिवादन

