
सिन्नर : (प्रतिनिधी) सिन्नर येथील श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २४ पदके पटकावली.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या १४ विद्यार्थ्यांची १९ सप्टेंबर २०२६ रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
🥇 प्रथम क्रमांक – सुवर्णपदक
१९ वर्षांखालील मुले व मुली :
सौरभ गाडे
सिद्धेश खिल्लारी
यश वाघ
१७ वर्षांखालील मुले व मुली :
आदर्श वानखडे
श्रेयश बोर
स्पर्श पेंटेवार
समृद्धी सालकर
तेजस्विनी पर्वत
सृष्टी शिखरे
संस्कृती सोनवणे
१४ वर्षांखालील मुले व मुली :
सर्वेश आव्हाड
श्रवण पवार
रुद्र पवार
नमिता पवार
🥈 द्वितीय क्रमांक – रौप्यपदक
मनीष लोंढे
हंसिका नायडू
हर्ष गीते
आराध्य एखंडे
प्रतीक शर्मा
ईश्वरी वामने
🥉 तृतीय क्रमांक – कांस्यपदक
श्रेया सोनवणे
ऋता वैष्णव
सोहम लाड
साफिया पठाण
या यशासाठी कराटे प्रशिक्षक अमर रामदास बैरागी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी सुभाषजी देशमुख,( बडे सर ) चेअर पर्सन विजयाताई देशमुख( बडे मॅडम ) एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिरीन देशमुख,( दीदी) जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी सौ.मंगलाताई पवार तसेच एज्युकेशन ऑफिसर पाटील सर मुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी, सविता फड,कॅम्पस डायरेक्टर योगिता भाटजीरे, नरेंद्र वाघ सर, प्रल्हाद देशमुख सर यांच्यासह शिक्षकांनी पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

