
सिन्नर ( प्रतिनिधी )९ सप्टेंबर २०२६ शहिद शिरीषकुमार मेहता याच्यां बलिदान दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात शहिद शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारत भूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शिरीष कुमार मेहता यांच्या पंधराव्या वयात देशभक्ती जागृत झाली आणि त्यांनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून महात्मा गांधीजी व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रेरणेने जागृत होऊन आंदोलनामध्ये सहभाग घेतलामहात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना “चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली.

शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि “भारत माता की जय’, “वंदे मातरम्’चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला
गोळी मारायची तर मला मार असे म्हणणारे धाडसी शूरवीर शिरीषकुमार मेहता म्हणाले ही ऐकल्यानंतर संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. अशा शहीद शिरीषकुमार मेहता यांना विनम्र
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोंगडे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार संदिप मुठे यांनी मानले
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे ,आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक विजय मुठे, आकाश धोंगडे, संदिप मुठे, विलास कुलथे, किरण गाडेकर, योगेश मोरे, शरद जाधव ,माऊली चांदणे ,सावळीराम दिवे, रोहित मुठे ,सुधीर कराळे ,विवेकानंद प्रमाणे, कुमारी निकिता मुठे आदि.उपस्थित होते

