
नांदगाव:—
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी

मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवण्यामागचा हेतू स्पष्ट करताना, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे आणि निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत कलाशिक्षक विजय देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शाडूच्या मातीपासून सुबक आणि आकर्षक गणपतीची मूर्ती कशी तयार करावी, याच्या विविध टप्प्यांचे सोप्या पद्धतीत प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून मूर्ती तयार करून घेतल्या.
या वेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी श्रेया पगार हिने सांगितले, “स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवण्याचा अनुभव खूपच आनंददायी आणि शिकण्यासारखा होता. यामुळे निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेशही आम्हाला मिळाला.”
पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे व मूर्तिकार विद्यार्थ्यांचे तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी कौतुक केले.
या कार्यशाळेत विद्यालयातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

