
नांदगाव (प्रतिनिधी)
मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे भूगोल विभागा 16 सप्टेंबर “जागतिक ओझोन दिन “उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन यु पाटील सर यांच्या पूर्वपरवानगीने महाविद्यालयातील IQAC च्या अंतर्गत घेण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाचे विभागप्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे चे सिनेट सदस्य प्रो. डॉ. सी.बी . निगळे यांनी जागतिक ओझोन दिन या विषयी माहिती देताना म्हणाले की जागतिक स्तरावर चा हा प्रश्न आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणून याचे दुष्परिणाम आपल्या पुढील पिढींना भोगावे लागू नये म्हणून आजच या विषयाचे महत्त्व पटवून व समजून घ्यावे असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए.मराठे हे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी या विषयाचे संदर्भातील वेगवेगळे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना माहिती पटवून दिली. भूगोल विभागाचे डॉ.बी.एम अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत या दिनाविषयी सविस्तर माहिती दिली व तसेच कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानलेत. तसेच सूत्रसंचालन भूगोल विभागाचे श्रीमती एस. ए. आवारे मॅडम यांनी केले .याप्रसंगी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभाग विभागप्रमुख डॉ. एस.एस.शेंडगे , अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ.आर.टी.आहिरे वाणिज्य विभागतून प्रा.एस.जी. पवार सर व भूगोल विभागातील SY/TYBA वर्गातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


