
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९५ वा दिवस

तुम्ही जमिनीमध्ये बी पेरता. त्याला हवा पाणी खत माती आदी देऊन त्याची जोपासना करता, पण जेव्हा त्याचे पुढे रोप व नंतर विशाल वृक्ष होतो, तेव्हा तो काय हवा बनतो, की माती बनतो, की पाणी बनतो? नाही. तो हवा पाणी माती यामधून सारभाग आत्मसात करून स्वतःच्या प्रकृतीधर्मानुसार एक विशाल वृक्ष बनतो. तुमचेही धोरण असेच असले पाहिजे. खरोखरच इतरांपासून आपण शिकाव्यात अशा पुष्कळ गोष्टी आहेत. त्या आपण शिकाव्यात, आपल्या पध्दतीने ग्रहण करुन आत्मसात कराव्यात. मात्र स्वतःचे वेगळेपण जपावे. कोणाचीही अंधानुकरण किंवा हुबेहूब नक्कल न करता, त्या गोष्टी आपल्या स्वभावानुसार आणि गरजेनुसार आत्मसात (Adapt) केल्या पाहिजेत. गर्दीचा हिस्सा होण्याण्यापेक्षा स्वतःचे वैशिष्ट्ये आणि वेगळेपण Unique Identity जपणे हेच खऱ्या विकासाचे लक्षण आहे.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २५ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२६
★ १९१६ विख्यात शास्त्रीय गायिका एस. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्मदिन.
★ १९४२ निसर्ग कवी व प्रगतशील शेतकरी नामदेव धोंडो तथा ना. धो. महानोर यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन.

