
नाशिक: दि.३० वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचालित जनता विद्यालय रामेश्वर विद्यालयात कृषीभूषण कै.पोपटराव (आण्णा) ठगण पगार यांचे १२ वे पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी कै पगार यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब ढेपले यांनी केले. व्यासपीठावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी, श्री सावंत बी एस, शिक्षक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. सावंत बी एस यांनी केले. विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना कु.नुतन जाधव, कु.देवयानी निकम, कु. राधिका पगार यांनी कै. पोपटराव पगार यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. जेष्ठ शिक्षक श्री.पगार जी टी व श्री सावंत बी एस यांनी कै. पगार यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब ढेपले यांनी कै पोपटराव पगार यांच्या शैक्षणिक सामाजिक कृषी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याविषयी सविस्तर विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, रामेश्वर सारख्या छोट्या गावाला आपली कर्मभूमी मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वप्रथम त्यांनी रामेश्वर बंधारा मंजूर करून आणला. गावातील उजाड रानमाळावर बंधाऱ्यातून कालव्याच्या मदतीने गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत नंदनवन फुलविले. बहुजन समाजाच्या मुलांची शिक्षणाची परवड पाहून गावामध्ये जनता विद्यालय रामेश्वर नावाने मराठा विद्या प्रसारक समाजाची माध्यमिक शाखा सुरू केली. गावातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गावांमध्ये सहकारी तत्त्वावर सोसायटी सुरू केली. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी -बियाणे, खते व इतर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिल्याने परिसरातील शेतकरी कृषी क्षेत्रात प्रगती पथावर असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. आभार श्री सावंत बी एस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री भामरे पी एस, श्री गायकवाड एस टी, श्री आहेर एम के, श्री परदेशी जी बी, श्री आहेर पी. डी, श्रीमती भामरे, श्रीमती. निकम पी के, श्रीमती जाधव एस. डी, श्री पाकळे पी एन, श्री. पगार जे एस,श्रीमती मोरे श्री पवार एस.पी, श्री पवार व्ही. व्ही यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

