
विंचूर (प्रतिनिधी श्री बाळासाहेब चव्हाण.. विंचूर, तालुका- निफाड )
येवला राष्ट्रीय महामार्गावर गोई नदीच्या तीरावर श्री सिद्धिविनायकाचे भव्य उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर आहे…
सरदार विंचूरकर यांच्या राजवटीतील छोट्याशा देवळाचे देशमाने येथील ग्रामस्थांनी सन १९७५ चे सुमारास छोटेसे मंदिर उभारले.. हे मंदिर देशमाने गांवाच्या प्रवेशद्वाराचे बाहेर आहे… सण २०१७ मध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून व देणगीतून त्या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे…
या मंदिराचे पाठीमागे पुरातन कालीन “शमी” वृक्षाचे झाड असून त्याखाली ही पांच फूट उंचीची मूर्ती असून ती उजव्या सोंडेची आहे.. सन २०१२ मध्ये गावकऱ्यांनी सिद्धिविनायक गणपती मंदिर देखभाल दुरुस्तीसाठी ट्रस्टची स्थापना केली आहे.. पर्यटन विभागाकडून या सिद्धिविनायक मंदिर ला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे
या ठिकाणी दर चतुर्थीला विशेषता “अंगारक चतुर्थीला” व “गणेश जयंती”च्या दिवशी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते..
माननीय आमदार व मंत्री महोदय भुजबळ साहेब यांचे स्थानिक विकास निधी मधून परिसराचा विकास करण्यात आलेला आहे… त्यामध्ये भक्त निवास, काँक्रिटीकरण, सभा मंडप स्वच्छतागृह इत्यादी कामे झालेली आहेत…!!
गणेश भक्तांनी या स्थळाला अवश्य भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा…
हे स्थळ विंचूर पासून नऊ किलोमीट तर नाशिक पासून 46 किलोमीटर तर येवला येथून साधारण 21 किलोमीटर अंतरावर आहे

