
साकोरा( प्रतिनिधी )साकोरा गटात मा.गटशिक्षणाधिकारी श्रीमती आरती देशमुख यांनी वाहतूक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, नागरिक जबाबदारी या विषयी माध्यमिक व प्राथमिक मध्ये विविध उपक्रम आयोजित केले होते. वाहतूक विषय नियम, सुरक्षा याबाबत सविस्तर व्याख्यान त्यांनी विद्यार्थ्यांना दिले . त्यानंतर मा. गटशिक्षणाधिकारी देशमुख मँङम यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीविषयी घ्यावयाची काळजी, शाळेत येताना व जाताना घ्यावयाची काळजी याबाबतीत छान असे मार्गदर्शन केले विद्यार्थिनीनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे व, सुरेख फलक लेखनातून संदेश दिल्याबद्दल कौतुक केले. तसेच इयत्ता सहावी वर्गातील यशश्री बोरसे हिने वाहतूक नियमाबाबत छान असे मनोगत केले. यावेळी त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी शैलेश टिळेकर, केंद्रप्रमुख महाजन सर उपस्थित होते उपस्थित मान्यवराचे विद्यालयाकङून शाल-श्रीफळ, पुष्प-गुच्छ देऊन मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाबड सर यांनी केले.

