
नांदगाव तालुक्यातील जनता विद्यालय बोयगाव येथे दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली सोबत महाराष्ट्र शासन उपक्रमांतर्गत माहिती अधिकार दिन हा साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. पी.ए. विसपुते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ता म्हणून आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, बटुकेश्वर दत्त या क्रांतिवीरांविषयी माहिती दिली तसेच 12 ऑक्टोबर 2005 मध्ये अस्तित्वात आलेल्या माहिती अधिकार अधिनियम याच्या विषयी विद्यार्थ्यांना कायद्याचे स्वरूप, व्याख्या, नागरिकांची कर्तव्य, प्रशासनामध्ये असणारी पारदर्शकता, याबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.
या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक श्री. हिरे सर यांनीही माहिती अधिकार फार्म बाबत प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना माहिती अधिकार फॉर्म कसा भरावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हिरे सर यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

