
बागलाण ( प्रतिनिधी ) बागलाण येथे ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत मतदार जनजागृती शिबिराचे आयोजन बागलाण ,
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नामपूर येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात
‘११६ – बागलाण विधानसभा (अ.ज.) मतदार संघ’ यांच्या वतीने ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत मतदार जनजागृती व मतदार नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु बी कदम उपस्थित होते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एम व्ही दासनूर उपस्थित होते.बागलाणचे नायब तहसीलदार रवींद्र बच्छाव मंडळ अधिकारी मोरे भाऊसाहेब ग्राम महसूल अधिकारी गौरव सूर्यवंशी केंद्रप्रमुख सुगंध बच्छाव सुभाष अहिरे निवडणूक व महसुल विभागाचे संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिराचा मुख्य उद्देश तरुण आणि नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांची मतदार यादीत नोंदणी करून घेणे हा होता.शिबिरात उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीत मतदानाचे काय महत्त्व आहे,

यावर सखोल मार्गदर्शन केले. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपली नाव नोंदणी करून राष्ट्रीय कर्तव्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोहिमेला महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राम बागुल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनील खैरनार श्री अनिकेत वाघ श्री चैतन्य ठाकूर श्री घनश्याम निकम यांनी परिश्रम घेतले

