
नक्षत्राचं देणं काव्यमंच
मुख्यालय, भोसरी -पुणे 39 आयोजित..
27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल 2026 व
27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धचे पारितोषिक वितरण समारंभ तसेच पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष -मा. श्री.प्रा. नरेंद्र पोतदार
( ज्येष्ठ कवी, विचारवंत, गोंदिया)व
कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री राजेंद्र गवते
( काव्यरसिक, पिंपरी )कार्यक्रम प्रमुख पाहुणे
मा श्री प्रवीण तुपे( संचालक- प्रमुख- सायन्स पार्क,चिंचवड), कवी प्रा.महादेव रोकडे,लेखिका सौ साधनाताई चौधरी,शरदराव ताजणे, श्रीराम एरंडे, संजय माने, सौ वैशाली बोरकर, काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे इ. अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नरेंद्र पोतदार म्हणाले की, ” कवीच्या कवितांना शरीर, मन ,आत्मा असला पाहिजे .कवितेला स्पर्धा नसते .आपल्या प्रतिभेनुसार कविता कवी लिहीत असतो. पण स्पर्धेमुळे दर्जा मात्र नक्की सुधारतो. आणि त्यासाठी आपले वाचन खूप आवश्यक आहे. कवितेची चळवळ उभी करणारी एकमेव महाराष्ट्रातली ही संस्था आहे. यांचं काम सर्व कवींना प्रेरणा देणारे आहे .कवीने कलामंचच्या माध्यमातून हजारो कवी घडवण्याचे काम केले आहे. भविष्यातील अनेक कवींनी या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या प्रतिभेला फुलवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उपक्रमात सहभागी होऊन हे कार्यक्रम यशस्वी करावे असे यानिमित्त त्यांनी आवाहन केले आहे. कवितेचा स्पर्श झालेली माणसे ही समाजाला दिशा देण्याचे काम करत आलेली आहेत. संवेदनशीलता जपल्याशिवाय कवी घडू शकत नाही. समाजाची विस्कटलेली घडी फक्त कविताच बसवू शकते असा माझा विश्वास आहे. समाजाने कवींना जपले पाहिजे. “
कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र गवते आपल्या मनोगतात म्हणाले की, ” गेले सत्तावीस वर्ष सुरू असलेला हा काव्ययज्ञ कवींच्या लेखणीला फुलवणारा आहे. पिंपरी चिंचवड कवितेची राजधानी बनविणारा हा एकमेव काव्य मंच आहे. हजारो कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेने अनेक कवी घडवले आहेत. भविष्यातील संस्थेच्या उपक्रमां ना माझ्या शुभेच्छा आहेत. रसिकता जपण्याचे काम या काव्यमंचाने केले आहे.”
यावेळी पुस्तक प्रकाशन समारंभा मध्ये
बदलती प्रसारमाध्यमे व कायदा(लेखक संजय माने, पिंपरी ),ओघळणारे अश्रू( कथासंग्रह )-
कवयित्री सौ वैशाली( जया) बोरकर, नागपूर,व
वादळ (चारोळीसंग्रह )कवी -वादळकार,पुणे प्रकाशित करण्यात आली. सदर कार्यक्रमात
समाजभूषण पुरस्कार 2026-मानकरी मा श्री संजय नलावडे(स्तंभलेखक व विचारवंत,मुंबई),मानकरी मा श्री दत्तात्रय मुठे( आदिवासी सेवक व पर्यटक प्रेमी, फोफसंडी),
समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार 2026, कविवर्य श्री सुरेशचंद्र चनाल, निगडी,
कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार 2026 ग्रामीण कवी रामदास अवचर,सुपे यांना सन्मानचिन्ह,गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी 19 वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा 2025 मध्ये प्रथम क्रमांक-मानकरी- सृजन संवाद,द्वितीय क्रमांक-
मानकरी – मनोकल्प,तृतीय क्रमांक -मानकरी- छायांकित
मानकरी – पद्मरत्न पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी 27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण संपन्न करण्यात आले . विजेत्यांना स्मृतीचिन्ह,गौरव पत्र,रोख रक्कम, गुलाबपुष्प, पुस्तकं देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.यात प्रथम क्रमांक-
कविवर्य नामदेव पाटील (कोल्हापूर),शीर्षक – श्रावण व निसर्ग ” हसत नाचत बागडत
श्रावण हा आला
निसर्गाच्या सौंदर्याचा
मनोमन आनंद झाला.
द्वितीय क्रमांक –
कविवर्या प्रभा शांताराम वाघ (चाकण)
शीर्षक – क्षण श्रावणाचे
” गगनाच्या कोंदणात
असे जपले जपले!
अलवार श्रावणात
घननीळ बरसले. “
तृतीय क्रमांक-
कविवर्या सौ कविता दाते (वर्धा )
शीर्षक – माया श्रावणाची
” सलगी उन्हाची, त्या रिमझिम धारांची,
कुजबुजला वारा, ही जादू श्रावणाची.. “
उत्तेजनार्थ 1-
कविवर्य धनाजी खाडे (वसई )
शीर्षक – श्रावण चाहूल
” नक्षत्रांनी चाहूल दिली नभात झाली गर्जना,
सृजनाची ओढ लागली सर्वत्र भूजना. “
उत्तेजनार्थ 2
कविवर्य नीलकृष्ण देशपांडे ( यवतमाळ)
शीर्षक – श्रावण सोहळा
” धरती ही गर्भार जणू की, अंकुर दे हुंकार,
स्वप्न हिरवे या मातीचे, होत असे साकार. “
उत्तेजनार्थ 3
कविवर्य श्रीपाद टेंबे (पुणे )
शीर्षक – मनात बरसलेला श्रावण
” पहिली सर आली की,
मातीला सुगंध मनात भरून जातो.
तहानलेल्या धरतीच्या कुशीत,
जगण्याचा नवा अंकुर डोकावतो. “
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या कवी. कवयित्रींनी श्रावण व निसर्ग या विषयावरच्या सुंदर रचना सादर करून श्रावणी काव्य मैफल भारदार संपन्न केली. प्रत्येक सहभागी कवींना गुलाब पुष्प व सन्मानपत्र देण्यात आले.कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये डॉ,बबन चव्हाण, बालाजी थोरात, संजय पोटे, सुरेशचंद्र चनाल, प्रमोद डोंगरदिवे, सुजित माने, वेदांत बोरकर, शांतीलाल ननवरे, दिपक लांडगे डॉ. माधुरी बागुल,रवी भोजने, तुषार डावखर, प्रतिभा कीर्तीकर्वे इत्यादींनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सलग पाच तास चालणाऱ्या या श्रावणी काव्यसोहळ्याची सांगता विश्व गीत पसायदानाने करण्यात आली.सदर कार्यक्रम सायन्स पार्क नाट्यगृह( एसी ), विज्ञान केंद्र,चिंचवड,पुणे – येथे अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला.आतापर्यंत काव्यमंचने आठ अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन,170 प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्यमैफली, शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा, काव्य सहलीचे आयोजन केले आहे.काव्यमंचच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक,काव्यप्रेमी,प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे(कवी वादळकार, पुणे ), संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष-नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले.

