
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०८ वा दिवस

या, 'माणूस' व्हा. आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर या, आणि पाहा इतर देश कसे प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जात आहेत. माणसावर तुमचे प्रेम आहे काय? आपल्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? असेल तर आपण सारेजण अधिक चांगले होण्यासाठी, अधिक उन्नत होण्यासाठी प्राण पणास लावून झटूया. अंधश्रद्धा, संकुचित विचार आणि आळस सोडून देशाच्या प्रगतीसाठी सतत गतिमान राहण्याचा संकल्प करुया. मागे वळून बघू नका अत्यंत प्रियजनांनी अश्रू ढाळले तरी मागे वळून बघू नका. चला, पुढे पुढे चला! चल चल पुरतो निधेहि चरणम्सदैव पुरतो निधेहि चरणम्....
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास ७ शके १९४८
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२६
★ पितृपक्ष- तृतीया श्राध्द
★अंगारकी संकष्ट चतुर्थी
★ तृतीय श्राध्द भरणी श्राध्द ★ १८९९ बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्मदिन
★ १९१३ डिझेल इंजिनचे संशोधक रुडाॅल्फ डिझेल यांचा स्मृतीदिन
★ १९३२ मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्मदिन.
★ १९३२ विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचा जन्मदिन
★ १९६३ ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.
★ जागतिक ह्रदय दिन
★ राष्ट्रीय काॅफी दिन.

