
अंदरसुल(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अमृत कौशल्य विकास योजनेअंतर्गत येवला तालुक्यात तातडीने मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. श्री प्रभा भारती फाउंडेशन, विहितगाव, नाशिक रोड आणि अमृत कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र चालवले जाणार आहे. अशी माहिती आयोजक बाबा डमाळे पाटील यांनी दिली.
या प्रशिक्षण केंद्राची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे आणि खुल्या प्रवर्गातील युवक, युवती,महिला, पुरुष सर्वांसाठी शासनाची ही योजना आहे. विशेष म्हणजे ए.सी. प्रवर्गासाठी स्वतंत्र कोटा ठेवण्यात आला असून, त्यांच्यासाठी ठराविक जागा व अनुदान देखील मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्ये हेअर आणि मेकअप, शिवण काम कोर्स बेसिक ते अॅडव्हान्स ईसमेंकिंग प्रशिक्षणआरी वर्क कोर्स,डिझाईन, मटेरियल आणि प्रत्यक्ष कौशल्य
हे सर्व कोर्सेस प्रात्यक्षिकांवर आधारित असून, प्रशिक्षक नामवंत इंडस्ट्री मास्टर्स असणार आहेत. कोर्सचा कालावधी ३ महिने असून,अमृत महाराष्ट्र, अमृत पॅट, अमृत पॅटर्न पोर्टलसाठी काम करण्याची संधी देखील मिळणार आहे.याकरिता आधार कार्ड, फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, १०/१२ वी पास दाखला आवश्यक आहे.नाव नोंदणी साठी ९८५०५९९९६६ या क्रमांकावर संपर्क करून सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बाबा डमाळे पाटील यांनी केले आहे.

