
२९ सप्टेंबर २०२६ सत्यशोधक, कृतिशील विचारवंत पत्रकार हमीद दलवाई यांच्या ९४ व्या जयंती निमित्त संविधान प्रेमी , महामित्र परिवार व अध्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास व सत्यशोधक चळवळीचे हमीद दलवाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी सत्यशोधक चळवळीचे हमीद दलवाई यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश घेतला होता.तेव्हापासूनच महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि राजाराम मोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला. हिंदू धर्मातल्या बालविवाह आणि सती प्रथेला विरोध राजाराम मोहन रॉय यांनी केला
होता. तसेच आगरकर हे समाजसुधारकांचे अर्ध्वयू बनले होते.सत्यशोधक समाजाचा अभ्यास केल्यावर हमीद दलवाई यांच्या लक्षात आलं की समाजसुधारणा ही फक्त एखाद्या धर्मापुरता मर्यादित असता कामा नयेत. ज्या प्रमाणे हिंदू धर्मातील प्रथांविरोधात त्यांच्या धर्मातील लोकांनी आवाज उठवला त्याचप्रमाणे आपणही मुस्लीम धर्मातील अनिष्ट प्रथाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं त्यांना वाटू लागले.सत्यशोधक हमीद दलवाई यांचे निधन अतिशय कमी वयात झाल्याने त्यांची आठवण म्हणून त्यांचे मित्र डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव हमीद असे ठेवले.स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ब्राह्मण असून देखील सुद्धा त्यांनी आपल्या मुलाचे नाव मुस्लिम समाजातील हमीद असे ठेवले. अशा महान सत्यशोधक समाज सुधारक हमीद दलवाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
विजय मुठे यांनी मनोगतात सांगितले की हमीद दलवाईंचे जीवन जितके संघर्षमय होते तितकाच त्यांचा मृत्यूही संघर्षमय होता. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले होते की माझा अंत्यविधी हा कोणत्याच धर्मानुसार होऊ नये असे प्रतिपादन केले.
शरद शेळके यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले की हमीद दलवाई यांनी मुस्लिमांचे मराठी साहित्य,मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हमीद दलवाई यांनी कार्य केले असे म्हटले.
स्तंभलेखक प्रा.प्रभाकर चतुर यांनी आपल्या मनोगतात तिहेरी तलाक रद्द व्हावा यासाठी मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी पहिला मुस्लिम महिलांचा मोर्चा त्यांनी काढला असे प्रतिपादन केले.
यावरून खऱ्या अर्थाने हमीद दलवाई हे मुस्लिम समाजाचे सत्यशोधक, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व मानवतावादी विचारसरणीचे होते असे म्हणता येईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रभाकर चतुर सर यांनी केले व आभार सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक शरद शेळके सर यांनी मानले
यावेळी उपस्थित महामित्र दत्ता वाचवले कॉम्रेड हरिभाऊ तांबे आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे प्रा. प्रभाकर चतुर सर, शरद शेळके सर,विजय कु-हडे ,भरत शिंदे,गोविंद अष्टेकर,शिवा सातभाई आदी उपस्थित होते.

