
आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती व राणा पुंजा भील यांची संयुक्त जयंती तसेच जागतिक शिक्षक दिन आदिवासी मुंलीचे शासकीय वसतिगृह सिन्नर मध्ये उत्साहात संपन्न
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले राणी दुर्गावती राणा पुंजा भील यांच्या प्रतिमेस मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राणी दुर्गावती या गोंडवाना साम्राज्याच्या एक महान, शूर आणि पराक्रमी वीरांगना रानी होत्या, त्यांनी १५ व्या शतकात मध्ये मुघलांच्या विरोधात लढले मुघल सम्राट अकबराला गोंडवाना आपल्या अधीन करायचे होते. १५६४ मध्ये आसाब खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने गोंडवानावर आक्रमण केले.शौर्य राणी दुर्गावतीने स्वत: रणमैदानावर उतरून मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडले आणि त्यांना मुघलांच्या विरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या अशा वीरांगणास विनम्र अभिवादन आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राणा पुंजा भिल्ल हे १६ व्या शतकात एक शूर आदिवासी (भिल्ल) योद्धा आणि भोमट प्रदेशाचे राजा होते.हल्दीघाटीच्या युद्धातील भूमिका १५७६ मधील प्रसिद्ध हल्दीघाटीच्या लढाईत त्यांनी भिल्ल योद्ध्यांच्या मजबूत नेतृत्व केले. अशा महान योद्धास विनम्र अभिवादन
यावेळी ऐ.ए .कादरी सर (लिपिक) यांनी जागतिक शिक्षक दिना यांच्या बद्दल त्यांनी सांगितले की
जागतिक शिक्षक दिन दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.शिक्षकांचे समाजातील अमूल्य योगदान, त्यांचे हक्क आणि त्यांच्या व्यावसायिक स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो असे म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कांचन कुंदे हिनी केले व प्रास्ताविक कुमारी रोहिणी घारे हिनी केले तर आभार कावेरी गोडे हिनी मानले
यावेळी श्रीमती के पी तायडे मॅडम( गृहपाल) ,ए ए कादरी सर (लिपिक), रमेश माळी (सहाय्यक) मंगल माळी (सह सहाय्यक ),महामित्र दत्ता वकयचळे आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे ,कुमारी कांचन कुंदे ,रंजना धोंगडे ,रोहिणी धोंगडे ,रोहिणी घारे, सानिका कुंदे, आरती कुंदे ,मोहिनी कुंदे, मयुरी खोकले, विद्या खोकले ,प्रतीक्षा घाणे, कावेरी गोडे, आरती जाधव, रेणुका गोडे ,कविता सारुकते, प्रियांका, कुवर रेणुका मावची, आरती पावरा आदि उपस्थित होते

