
सुंदरपूर / नाशिक: आज दिनांक रोजी स्वामी जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते नैसर्गिक शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे चालक संदीप प्रभाकर सोमवंशी यांनी महाराजांकडून नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रसायनमुक्त शेती याबाबत सविस्तर माहिती घेतली.
महाराज म्हणाले, “रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. नैसर्गिक शेती हीच समृद्ध शेती आहे. गो-आधारित शेती केल्यास खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळते. विषमुक्त अन्न हीच खरी सेवा आहे.”

या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला. सोमेश्वर शेतकरी गटाच्या माध्यमातून गावात नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गट, सुंदरपूर, ता. निफाड, जि. नाशिक
- बीआरसी चालक संदीप प्रभाकर सोमवंशी सुंदरपुर

