
निफाड (प्रतिनिधी ) १४ वर्षापासून अखंड ज्ञानसेवेचा वसा जपणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेला
६ ऑक्टोबर रोजी सुरूवात होत असून ९ ऑक्टोबर पर्यंत चार दिवस सुरू असणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र – गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.जयंत जायभावे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
शारदीय व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व वक्ते मा.स्वानंद बेदरकर ,मा.डॉ.श्रीमंत कोकाटे,मा.दिलीप खाटेकर,मा.अनंत सरोदे व्याख्यानासाठी उपस्थित राहणार आहेत.निफाड शहर व पंचक्रोशीतील श्रोत्यांनी रोज रात्री ८.०० वा. रविराज मंगल कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन शारदीय व्याख्यानमाला समितीचे मार्गदर्शक वि.दा.व्यवहारे , अध्यक्ष रतनतात्या वडघुले , कार्याध्यक्ष अनिल पा.कुंदे , कोषाध्यक्ष राजेंद्र राठी, कार्यवाह नईमखान पठाण व सदस्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

