
नाशिक: दि.६ (वार्ताहर)
गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’…! साहित्यिक रसिक आणि श्रोत्यांशी गप्पांचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोपान वाटपाडे लिखित ‘जनकल्याण राजा छत्रपती शिवराय’ या लोकप्रिय ‘शिवचरित्र’ पुस्तकावर आज त्यांच्याच भाषेत छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांना जाणून घेऊया. सदर कार्यक्रम स्थळ हुतात्मा स्मारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित केला आहे. तरी सर्व साहित्य रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

