
मनमाड, दि. ५ – येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाले अंतर्गत “व्यक्तिमत्व विकास आणि सकारात्मक दृष्टिकोन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी *प्रा. दिलीप शिंदे* हे प्रमुख संसाधन व्यक्ती (Resource Person) म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, ध्येय निश्चिती, नेतृत्व गुण, वेळेचे व्यवस्थापन आणि अपयशाला सामोरे जाणे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणे व कृतींद्वारे त्यांनी समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *प्राचार्य डॉ. गवाणे* होते. समन्वयक प्रा. देवडे डॉ. प्रा. कदम* व इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राचार्यांच्या हस्ते प्रा. शिंदे यांचा सत्कार करण्यात


