
नाशिक: दि.६ (वार्ताहर) नाशिक येथे झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांची कन्या तनिष्का हिने प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेतील 19 वयोगटातील केटीएचएम कॉलेज डिलीजिएंट बारावी सायन्स शाखेत शिकत असलेली तनिष्का अनिल राठी हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रीती करवा यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ श्रीमती के एम अहिरे, उप प्राचार्य डॉ के एस शिंदे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा किरण रेडगावकर, प्रा कैलास शिंदे, को-ऑर्डिनेटर बापू सोनवणे, क्रीडा अधिकारी प्रा हेमंत पाटील, प्रा अविनाश कदम, प्रा सागर कडलग, प्रा उद्धव डेरले , मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे, संचालक ॲड लक्ष्मणराव लांडगे, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल, डॉ नेहते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ वैशाली कदम, योगेश धनवटे, डॉ मंजिरी सराफ, डॉ प्राची पवार, ओझरचे ज्ञानेश्वर देसले, छाया जाधव, हिवताप कर्मचारी पतसंस्थेचे संचालिका,पल्लवी कुलकर्णी, आई शीतल राठी, ईशान चेस अकॅडमीचे अमित तारे, डी चेस झोनची धनश्री राठी, मंगेश गंभीरे, जळगाव येथील प्रवीण ठाकरे,ओझर येथील माहेश्वरी समाजाचे संजय सारडा, संतोष लढ्ढा, विनोद चांडक, दिंडोरीचे खासदार मा भास्कर भगरे, यांनी तनिष्काचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

