
ढेकू.(प्रतिनिधी ) ढेकू आश्रम शाळेत वन विभागा मार्फत वन्यजीव प्राणी संरक्षण व संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला
ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे महाराष्ट्र शासन वन विभागाचे अधिकारी श्री हेमंत हेमंत कोकाटे साहेब (R F O), श्री दीपक वडगे वनपाल श्री नवनाथ बिन्नर वनरक्षक श्री अण्णा टेकनर वनरक्षक श्री अमोल पवार वनरक्षक श्री वाल्मीक चव्हाण वनरक्षक यांच्या उपस्थितीत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत वन्यजीव प्राणी संरक्षण व संवर्धन सप्ताह ( २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर)निमित्ताने प्राण्यांविषयी आपुलकी, त्यांच्यापासून होणारे धोके त्यासाठी आपण घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले .प्रत्येकाने किमान एक वृक्ष लागवड करून संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी वन अधिकारी श्री हेमंत कोकाटे साहेब यांचा सत्कार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री डी आर सूर्यवंशी यांनी शाल व श्रीफळ देऊन केला व त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी वनपाल वनरक्षक यांचा सत्कार शाळेचे अधीक्षक श्री नितानकर नितीन एकनाथ यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार अनिल यांनी केले तरश्री धाकतोडे यांनी सर्वाचे शाळेमार्फत आभार मानले .
कार्यक्रम प्रसंगी इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते .तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते


