
नांदगाव (प्रतिनिधी)सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे, सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर समाज कल्याण, नाशिक, आणि बार्टी समतादूत शिल्पा मालपुरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महावीद्यालयाच्या सेमिनार हाॅल मध्ये “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष ,अनिष्ट व उच्चाटन अध्यादेश २०१३ या कायदेविषयक प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.एन.यू.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.आर.मराठे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.डी.एम.राठोड,प्रा.बी.के. पवार आदी उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक नांदगाव अनिस चे सचिव प्रा. सुरेश नारायणे यांनी”अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ” या विषयावर मत मांडले व कोणत्याही अफवेवर किंवा अंधश्रद्धेवर आंधळा विश्वास ठेवू नका, वैज्ञानिक दृष्टिकोन,मानवता, आणि संविधानीक मूल्य जपा व विवेकाचा संदेश देण्याचे त्यांनी मत मांडले. तर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ या कायदेविषयक प्रबोधन कार्यशाळा प्रमुख मार्गदर्शक समाज कल्याण कार्यालयाच्या शिल्पा मालपूरे यांनी प्रबोधन केले. अनिष्ट रुढी समाजात कमी झाली तर देशाची प्रगतीला मदत होईल . बार्टी ही संस्था चांगला उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाला व कार्यशाळेला उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. एन.यू.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जादू-टोणा म्हणजे काय? भूत,भानामती, समज-गैरसमज,नरबळी, तंत्रमंत्र या बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यशाळा अत्यंत प्रभावी झाली. हसत-खेळत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व कायद्यातील तरतुदी व अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.बी.के.पवार यांनी केले. तर आभार प्रा.डी.एम.राठोड यांनी मानले. यावेळी प्रा.जी.व्ही.बोरसे,प्रा.अजय पानसरे,प्रा.ए.के.जाधव, प्रा.आर.डी.पाटील, प्रा.पी.एन.जपे,प्रा.बी.जे. गावीत , प्रा.जी.के.बेंडकुळे,प्रा.महाले,प्रा.तुपे,प्रा.श्रीमती टी.एन.आहेर,प्रा.श्रीमती लोखंडे,प्रा.झेड.एम.अन्सारी,प्रा.श्रीमती फापाळे,प्रा.एस.सी.पैडणकर,प्रा.व्हडगळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नांदगावचे कार्यकर्ते व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

