
भारत नगर ज्येष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर
नाशिक (वार्ताहर) येथील भारत नगर ज्येष्ठ नागरिक संघाची सन २०२६-३१ या पाच वर्षांकरिता नवीन पदाधिकारी मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडण्यात आली. संघाच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष: श्री उत्तमराव कडलक
उपाध्यक्ष: श्री आप्पासाहेब जाधव
कार्याध्यक्ष: श्री रामनाथ मोरे
सहकार्याध्यक्ष: श्री मनोहर मोगल
सचिव: श्री श्रीकृष्ण आवारे
सहसचिव: श्री एकनाथ तपकिरे
खजिनदार: श्री बापूराव अहिरे
सल्लागार: श्री विष्णू लोहकरे
मार्गदर्शक: श्री अशोकराव पोटे
संचालक मंडळ: श्री चंद्रकांत माळोदे, श्री शंकरराव मते, श्री किसनराव धारबळे, श्री विजय धनवटे, श्री दौलतराव शिंदे, श्री मधुकर कदम, श्री तानाजी लभडे, श्री रामभाऊ निकम, श्रीमती सुमती बोरोले व श्रीमती बैरागी यांची संचालकपदी निवड झाली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री उत्तमराव कडलक यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, मनोरंजन व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सभासदांच्या सहकार्याने संघाचे काम अधिक जोमाने पुढे नेले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचे नागरिकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. फेस्कॉम नाशिक प्रदेश सचिव धनंजय चतुर व अध्यक्ष नाना होळकर यांनी नवीन पदाधिकारी मंडळास शुभेच्छा दिल्यात.

