
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२४ वा दिवस

सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये ।
सा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी ॥
ती देवी, दुर्गा, भगवती, जगज्जननी माता प्रसन्न झाल्यावर मनुष्याला संसारातून जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष मिळण्यासाठी वरदान देते. तीच सनातन अनादी आणि अनंत पराविद्या म्हणजेच सर्वोच्च विद्या आहे, जी मुक्तीचे मुख्य कारण आहे. या महामायेला पूजावंदनादीद्वारा जोवर प्रसन्न करून घेत नाहीत, तोवर काय मजाल आहे ब्रह्माविष्णूमहेशादिकांची देखील की ते तिच्या हातून सुटून मुक्त होऊ शकतील? म्हणूनच या गृहलक्ष्मीची पूजा व्हावी, त्यांच्यात ब्रह्मभाव विकसित व्हावा, या हेतूने मी हा मठ स्थापन करीन. ज्या महामायेच्या रूपरसात्मक बाह्य आविष्कारांना भुलून माणूस अगदी उन्मत्तप्राय होऊन अडकून पडतो, पण जिच्या ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्यादी आतील आविष्कारांनी तो सर्वज्ञ, सिद्धसंकल्प, ब्रह्मज्ञ होतो, त्या जगन्मातेच्या सजीव मूर्तीच अशा स्त्रियांची पूजा करायला मी कधीच निषेध केला नाही.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २३ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२६
★ ललिता पंचमी
★ सद्गगुरु श्री. जनार्दन स्वामी जयंती
★ १७८९ उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचा स्मृतीदिन
★ १९०२ महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, भाऊराव कृष्णाजी ऊर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्मदिन.
★ १९२६ सुप्रसिध्द कवी नारायण सुर्वे यांचा जन्मदिन.
★ १९३१ एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, भारताचे राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, भारतरत्न डॉ. अब्दुल पाकिर जैनुलब्दीन ऊर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन.
★ अंध सहाय्यता दिन…
★ वाचन प्रेरणा दिन…
★ जागतिक विद्यार्थी दिन…
★ जागतिक हस्त प्रक्षालन दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

