
नांदगाव -(वार्ताहर)ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनुदानित आश्रम शाळा सारताळे येथे आज संस्था सरचिटणीस मा. रमेश अप्पासाहेब पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापिका मा. श्रीमती नम्रता शेवाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड माँ के नाम अभियांनांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी प्राध्यापक धीरज मधुकर सिंह परमार, अधीक्षक आर पी पाटील अधीक्षिका आशा बोरसे तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


