
सिन्नर (प्रतिनिधी )१२ नोव्हेंबर २०२६ क्रांतिवीर देवाजी राऊत यांना सिन्नर येथे महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पेठ परिसरातील

आदिवासींचे जंगलांवरील हक्क अधिकार इंग्रजांनी काढून तर घेतलेच मात्र भयंकर अन्याय अत्याच्यार सुरु केला . देवाजी राऊत हे सारं दृश्य पाहत होता . आदिवासींवरील अन्याय देवाजीला सहन नं झाल्याने तो पेटून उठला . इंग्रजी सत्ता उलथून पाडण्याची जणु शपथ घेऊन देवाजीने इंग्रजांना विरोध केला . जंगलामधील महादेव कोळी ,कोकणा, भिल्ल, वारली या जमातींच्या सैन्यांना एकत्र करून गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली या इंग्रजी अधिकारांच्या विरोधात लढा उभारून त्यांना साळो कि पळो करून सोडले . सहा वर्ष या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या देवाजीला इंग्रजांनी १८५७ ला पेठ येथील मामलेदार कचेरी समोर सर्वांच्या समक्ष फासावर चढविले. मात्र फाशीचा दोर तुटला व देवाजी राऊत तेथून जंगलाच्या दिशेने पळाले. इंग्रजांनी त्याला पकडले तेथेच जंगलात फासावर लटकवुन ठार मारण्यात आले. ज्या जोगमोडी व ननाशी दरम्यान त्यांना फाशी दिली ते ठिकाण “राऊत मारा फाटा” म्हणून अद्यापही अजरामर आहे.ज्या झाडावर फाशी दिले त्या झाडाला लागून एक दगड ठेवला आहे ,त्यांचे स्मारक म्हणून. देवाजी राऊत, १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात जोगमोडीजवळ”राऊत मारा फाटा ” येथे शहीद झालेला आदिवासी पुत्र! भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान योद्धा …पेठचा उठाव हा १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्रातील उठाव होता.अशा महान देवाजी राऊत देशासाठी फासावर गेलेल्या क्रांतिकारकाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे आकाश धोंगडे यांनी केले व प्रास्ताविक विजय मोठे यांनी केले तर आभार संजय गोळेसर यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, माजी नगरसेवक रुपेश मुठे आकाश धोंगडे धोंगडे अनिल काळे संजय गोळेसर किरण मुठे सुनील गुरुकुले बाळू पारे, बाळू पवार प्रकाश गुंजाळ ,रोहित मुठे, आदि उपस्थित होते.

