
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४५१ वा दिवस

आपली विचारशक्ती व प्रेमशक्ती अधिक सखोल करा. स्वतःचे जीवनकमल विकसित करा. भ्रमर आपण होऊन आपल्याकडे येतील. प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. मग ईश्वरावर विश्वास ठेवा. मूठभर बलवान माणसे जगाला हलवू शकतील. संवेदनाशील ह्रदय, विचारशील मेंदू, प्रेम भावना आणि निःस्वार्थ कर्म करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न बाहू या साऱ्यांची आपल्याला आवश्यकता आहे. प्रेम भावनेने प्रेरित होऊन केलेले काम ख-याअर्थांने सार्थकी लागेल यात शंका नाही. प्रेम भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास २० शके १९४८
★ कार्तिक शुक्ल /शुध्द २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ११ नोव्हेंबर २०२६
★भाऊबीज
★ यमद्वितीया
★ १८८४ मानवाधिकारासाठी अजीवन संघर्ष करणारे अमेरिकन नेते मार्टिन ल्युथर किंग यांचा स्मृतीदिन.
★ १८८६ रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्मदिन
★ १८८८ स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी नेते जीवतराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांचा जन्मदिन
★ १८८८ भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन.
★ १९२६ विनोदी अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ यांचा जन्मदिन
★ राष्ट्रीय शिक्षण दिन…
★ रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला सण लक्ष लक्ष शुभेच्छा आपणास आज आहे बहीण-भावांचा पवित्र भाऊबीजेचा सण.
दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

