
🔯🕉️ II शुभ दिपावली II ⚛🕉️
“दिवाळीचा सहावा व अखेरचा दिवस “
II भाऊबीज II
-II बहीण-भावांचा पवित्र सण II-
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होते. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.
सण साजरा करण्याची पद्धत
भाऊबीजेच्या दिवशी भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे असा शास्त्रात मानले जाते.
“रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण लक्ष लक्ष शुभेच्छा आपणास आज आहे बहीण-भावांचा पवित्र भाऊबीजेचा सण.”
भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा…
प्रा.अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी, ता. मालेगाव जि. नाशिक
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁

