
नाशिक:- ज्येष्ठ साहित्यिका सुनंदा साहेबराव पाटील यांच्या ज्ञानसिंधु प्रकाशन प्रकाशित ‘पंचज्योती’ (व्यक्तिचित्रे) आणि ‘रत्न लाभले मला’ (चरित्र) या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी (दि.१६) जुन्या गंगापूर रोडवरील विसे चौकातील बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातील सांस्कृतिक सभागृहात दुपारी ४ वा. होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राज शुक्ला, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, ज्ञानसिंधु प्रकाशनाचे प्रकाशक तान्हाजी खोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर सूत्रसंचालन करतील.
सोहळ्यास साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील परिवार आणि ज्ञानसिंधु प्रकाशनाने केले आहे.

