
दाभाडी (वार्ताहर) – तालुक्याच्या राजकारणाचे मुख्य केंद्र ठरलेल्या दाभाडीसारख्या प्रतिष्ठीत गावाचे ३२ वर्षे पोलीस पाटील पद अत्यंत लिलया पध्दतीने सांभाळून तंटामुक्तीचा राज्याचा प्रथम क्रमांकांचा अकरा लाखाचा पुरस्कार प्राप्त करुन देणारे कै. कारभारी निकम अजातशत्रू होते असे गौरवोद्गार माजी मुख्याध्यापक सुभाष निकम काढलेत ते कै. निकम यांच्या द्वितीय स्मृतीदिनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी डाळींब उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण देवरे, माजी जि. प. सदस्य अमृत निकम, संजय निकम, माजी सरपंच वसंत देवरे, त्र्यंबक निकम, सुभाष नहिरे, प्रकाश अहिरे आदी मान्यवरांच्या हस्ते निकम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

समवेत शरद देवरे, सागर देवरे, सुपारे, विजय निकम, अरुण निकम, निलेश देवरे, महेश निकम, योगेश देवरे, सुनिल ठाकरे, सचिन निकम, ओम निकम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक, आप्तेष्ट, मित्र परिवार, ग्रामपंचायत कर्मचारींसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अरुण देवरे, सुभाष निकम, प्रा. अमोल अहिरे, बापू यशवंत निकम, हरी निकम, निळकंठ निकम यांनी आपल्या मनोगतातून कै. कारभारी निकम यांच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल निकम यांनी केले, तर आभार पोलीस पाटील यांचे पूत्र अमोल निकम यांनी मानलेत.

