
नाशिक प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन– घोटी बाजारपेठेत तांदळात मोठया प्रमाणावर भेसळ होतेय,परराज्यातला कमी दर्जाचा तांदुळ घोटी-इगतपुरी या बाजारमुल्य असलेल्या नावाखाली विकला जातोय असे विविध आरोप करत घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी यांचे कारभारावर गेल्या काही दिवसापासुन प्रश्नचिन्ह उभे करणारे भुमिपुत्र फाऊडेंशनचे विनोद नाठे व नाठेचें आरोप हकनाक बदनामी करणारे आहे असा दावा करणारे व्यापारी संघटना व कृ.उ.बा.समिती संचालक मंडळ हे येत्या २० नोव्हें.रोजी दुध का दुध करण्यासाठी आमने सामने येणार आहेत. या मेळाव्याची कथित घोषणा बाजार समितीचे वतीने करण्यात आली असुन या कथित मेळाव्याकडे तालुक्यातील अनेकाचें लक्ष लागले आहे. गेले अनेक दिवसापासुन नाठे हे सोशल मिडीयाचे माध्यमातुन व्यापारी व संचालक मंडळ यांचे विरुद्ध विविध आरोप करत आहे. दरम्यान व्यापारी संघटनाने नाठेचें आरोप फेटाळुन लावले आहे.तर घोटी कृ.उ.बा ने ही हकनाक बदनाम करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सत्य नेमके काय आहे हे जनतेच्या दरबारात खुल्या मंचावर स्पष्ट व्हावे म्हणुन संचालक मंडळ व व्यापार्यानीं नाठे यांना शेतकरी मेळावा घेऊ असे सांगितले आहे.त्याच ठिकाणी सगळी भुमिका स्पष्ट करु असे म्हटले आहे. घोटी ही महाराष्ट्रातील मुरमुरा,तांदुळ, भात यासाठीची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ. या बाजारपेठेत कोटयावधी रुपयाची उलाढाल होते.दरम्यान सध्या याच बाजारपेठेत भुमिपुत्र फाऊडेंशनचे विनोद नाठे यांचे नाव चर्चेत असुन ते सोशल मिडीयावर गाजत आहे. त्यांनी सोशल मिडीयाचे माध्यमातुन व्यापारी व कृ.उ.बा.वर गंभीर आरोप केले आहे.
संपुर्ण भारतात कुठलाही कर न आकारणारी ही बाजार समिती आहे.शेतकरी हिताला ती प्राधान्य देते.
-अँड.संदिप गुळवेमाजी सभापती तथा जेष्ठ संचालक
आरोप बिनबुडाचे – व्यापारी संघटना कथित आरोप हे बिनबुडाचे आहे.एकच माणुस सतत आरोप करतोय.सत्य काय ते कळेल.-
समितीकडुन उत्तराची अपेक्षा- नाठे आरोपाला उत्तर दयायचे सोडुन शेतकरी मेळावा घेऊन यात समर्थकाकरवी सभा हाणुन नेली जाईल. त्यापेक्षा ठोस उत्तर दया.-विनोद नाठे

